प्रस्तावनाः
आपण अधिकाराची चर्चा करतो तेव्हा आपला आशय काय आहेघ् अधिकाराचे मूळ काय आहे. तसेच मानवी जीवनात अधिकाराचे काय महत्व आहे याची चर्चा आणास करावयाची आहे. जेव्हा आपण व्यक्ती आणि राज्याच्या संबंधातून अधिकाराचा विचार करतो. तेव्हा दोन बाबीचा विचार पुढे येतो. एका व्यक्तीला राज्याकडून काय प्राप्त होते व दुसरे व्यक्तीला राज्याचे कोणते कर्तव्य पार पाडावी लागतात. थोडक्यात अधिकार राज्यअंर्तगत व्यक्तीला प्राप्त होणारी अशी अनुकुल स्थिती व संधि आहे. ज्यामूळे व्यक्तीला आत्मविकासाचे पूर्ण सहकार्य मिळते जेणे करुन एका योग्य व आदर्श समाज व राज्याची पुर्नमांडणी करता येईल.
मानव अधिकार म्हणजे कायघ्
जगात हुकूमशाही, नाझीवाद, फॅसिझम, साम्राज्यवाद, महायुध्दे मानवीसंहार इ. अशा अनेक घटना व यांच्या प्रभावामूळे मानव अधिकाराचे मोठ्या प्रमाणात हनन झालेले आहे.व आज ही मोठ्या प्रमाणात मानव अधिकाराचे हनन होत आहे.
मानव अधिकार म्हणजे विश्वातील सर्व व्यक्तिंना कोणताही भेदभाव न करता व्यक्ति हा मानव आहे या भावनेतून प्राप्त होणारे व व्यक्तिच्या सर्वांगीण विकासाला पोषक असणारे सर्व अधिकार म्हणजे मानव अधिकार होय. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे एका व्यक्तिला माणूस म्हणून त्याच्याशी वर्तन करणे होय. सर हेरसच लाऊटरपेच यांच्या मते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायद्याचा अंतीम उदेश हा मानवी व्यक्तित्व व त्याच्या मुलभुत अधिकाराचे रक्षण करणे होय. अदाई स्टेव्हेनसन यांच्या मते आपण जे करतो व करण्याचा प्रयत्न करतो त्याचा गाभा मानव अधिकार होय. प्रा. लास्कीच्या मते व्यक्तिच्या सर्वागीन विकासासाठी अधिकाराची नितांत गरज असते. बोसांके यांनी आपण ज्या समाजाचे घटक असतो त्या समाजाच्या सर्वोच्च कल्याणाच्या दिशेने आपल्या जिवनाचा विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारे साधने म्हणजे अधिकार होत. बेंथम यांनी अधिकाराचा संबंध उपयोगीतावादाशी जोडला आहे. समाजाने मान्य केलेली व कायद्याद्वारे संमत केलेली व्यक्तिची न्याय मागणी म्हणजे अधिकार होत.
थोडक्यात मानवाधिकार वैश्विक व सार्वभौम आहेत. व्यक्तिचा जात,धर्म, वंश, भाषा, प्रदेश, राष्ट्र इ. कोणताही भेदभाव न करता जन्माने प्राप्त होतात. तसेच हे अधिकार कुणालाही हिरावून घेता येत नाहीत. राज्य यास संरक्षण बहाल करते मानवाधिकारामुळे व्यक्तिंची प्रतिष्ठा प्राप्त होऊन मानवी अस्तित्वासाठी नितांत गरजेचे आहेत.
मानव अधिकाराचा उदय व विकासः
मानव अधिकाराचा विकास मानवी जीवनाच्या सभ्यतेबरोबरच आणि जन्माबरोबरच झाला आहे. मानवी जीवनाच्या प्रारंभीचा काळ हा शक्ती संघर्षाचा होता. तेव्हा न्याय व कायमचा उपाय म्हणून युध्द हा पर्याय होता. युध्दात हरलेल्या गटाना जिंकलेल्यानी गुलाम बनवने जिंकलेले मालक व सरंजामदार ठरले. मानवी सभ्यता आणि संस्कतीच्या उदयाबरोबरच मानवी अधिकाराची देखील जाणीव निर्माण होऊ लागली. पूढे काळाच्या ओघात प्रारंभी ग्रीक नगरराज्याचा विचार करावा लागतो प्राचीन ग्रीक मध्ये स्टोईक विचारवंतानी नैसर्गिक अधिकाराचा पुरस्कार केलेला आढळतो. प्रत्येक व्यक्तिला मनुष्य प्राणी या नात्याने जन्मतः व निसर्गतः काही अधिकार प्राप्त होतात.
प्रसिध्द ग्रीक ‘प्ले‘ नाटक अॅन्टीगणी यामध्ये मानवाधिकाराचा सार पाहायाला मिळतो. या नाटकातील आशय असा आहे की, अॅन्टीगणीचा भाऊ ग्रीक राजा किंग क्रेआॅन विरोधात बंड करतो त्यामध्ये तो मारला जातो. राजा त्याचा अंतिम संस्कार करण्यावर बंदी घालतो. अॅन्टीगणी हि राजाच्या विरोधात जाऊन भावाचा अंतिम संस्कार करते. राजाचा आदेश मोडला म्हणून तीला अटक केली जाते. तेव्हा ती आपली बाजू अशी मांडते की मी ‘अपरीवर्तनीय, अलिखील अशा स्वर्गाच्या व देवाच्या कायद्याचे पालण केले आहे. या कायद्याचे उलंघन राजासुध्दा करु शकत नाही.‘ याचा अर्थ नागरीकांना नैसर्गिक अधिकार असून राजा ते अधिकार हिरावून घेवू शकत नाही. यामुळेच पूढे ग्रीक नागरीकाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्यासमोर समानता, नागरीकांची प्रतिष्ठा व आदर इ. अशा अधिकारातून मानव अधिकाराचा उगम शोधता येतो.
ग्रीक नगरराज्याची प्रतिष्ठा वाढवण्यात सॅक्रेटिस या तत्त्ववेत्याचे मौलिक योगदान आहे. त्यांनी न्याय, ज्ञान, नैतिकता इ. तत्वाची प्रतिपादन केले. मानवअधिकाराचे तत्व अंर्तभूत आहे. शिष्य प्लेटो यांनी साॅक्रेटिशच्या विचाराना पूढे चालू ठेवले आणि ‘रिपब्लीक‘ या ग्रंथातून न्याय प्रतिपादन केला. यामध्ये आपणास मानवाधिकार पाहता येतात. त्यांनी नैसर्गिक गुणवत्तेच्या आधारावर राज्याची उभारणी तीन वर्गाच्या माध्यमातून केली आहे. राज्याच्या कार्याचे विभाजन केले आहे. न्यायाच्या दृष्टिकोनातून मानवाधिकाराचा अर्थ पाहता येतो. तो असा की ‘प्रत्येक व्यक्तिने आप-आपली कार्य करावे दुसÚयाच्या कार्यात हस्तक्षेप करु नये.‘ तसेच ‘न्याय हा व्यक्तिगत व सामाजिक असतो. त्यात आत्मसंयम महत्वाचा आहे.‘ असे प्रतिपादन केले. पुढे अॅरिस्टोटलने ‘पाॅलिटिक्स‘ व ‘द कान्स्टीटयुशन‘ या ग्रंथातून मौलिक विचार मांडले ज्यामूळे राज्यशास्त्र विषयाचा उदय झाला. अरिस्टाॅटलने सदगुणाच्या आधारावर न्यायाचे प्रतिपादन केले आहे. पात्रतेच्या आधारावर सर्वनागरीकांना समान संधी देण्याची शिफारस तो करतो. वंचीत व शोषितासाठी वितरणात्मक न्यायाची शिफारस देखील करतो. सामान्य व विशिष्ट न्यायाची तरतुद करतो.
रोमन राजा माक्र्स ओरेलिअस (121-180) यांनी ‘मैडीटेशन‘ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र, समानता इ.चा तपशील तो देतो. महत्त्वाची बाब म्हणजे नैसर्गिक अधिकाराचे समर्थन करतो. मध्ययुग अंधकार युग म्हणून ओळखल्या जाते. मानव अधिकाराचा फारसा उल्लेख मिळत नाही. धर्म व राज्य सत्ता एकत्र निवास करत होते, म्हणून हा काळ अत्याचाराचा होता. पूढे अनेक मध्ययुगीन विचारवंतानी अधून-मधून अधिकारासंबंधी विचार प्रतिपादन केले आहेत त्यामध्ये थाॅमस एक्वीनास यांनी नैसर्गिक कायदा सर्वोश्रेष्ठ मानला आहे. संत आगस्टाईन ने कायद्याला कायद्याशी जोडले आहे.
मानव अधिकाराची संकल्पना खÚया अर्थाने अधिकतपणे युरोपात विचारात घेतली गेली आहे. विशेषतः ब्रिटनमध्ये मानव अधिकारासाठी झालेला संघर्ष सर्वश्रृत आहे. राजा जाॅन (1168-1216) ने ब्रिटन मधील प्रथा, संकेत, नियम धुडकावले होते. बैरणावर अधिक अन्याय व अत्याचार केला पोपशी संघर्ष केला. राजाने संपूर्ण जनतेप्रती वंशवादाचे धोरण अवलंबवले परिणामी जनतेत राष्ट्रीय विद्राहाची भावना जागृत झाली. 1212 ई. पासून विद्रोहाची ठिणगी पडली. 1214 मध्ये फ्रांस च्या लढाईत अपयश आले. राजा इंग्लडला परत आल्यानंतर विद्रोह अधिक तीव्र झाला. परिस्थिती हाताबाहेर जाते हे पाहून 15 जुन 1215 मध्ये ‘स्वातंत्राच्या घोषणा पत्रावर जाॅन राजाने सही केली. हा ‘मैग्नाकार्टा लिबररैटम‘ म्हणून ओळखला जातो. हा मुळ लॅटिन भाषेत आहे. एकून 63 कलमाची सनद होती यामध्ये राज्याच्या विशेष अधिकारावर मर्यादा घालण्यात आल्या.
चर्च व्यवस्था व स्वतंत्र निवडणूक तंत्र
सरजामदार.
सामान्य कायदेशीर व्यवस्था
संघर्षाचा अधिकार.
नगर, वाणिज्य व व्यापाराचा अधिकार
स्वायत शासनाच्या दोषाचे निराकरण
न्याय व कायद्याच्या व्यवस्थेत सुधारणा
कायदेशीर व्यवस्था
घोषणापत्राला व्यवहारिक बनवणे इ.
महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली हा मानव अधिकाराचा अमूल्य ठेवा आहे. मॅकव्हलीनी ‘डिसकाॅर्सेस आॅफ लिवी‘ मध्ये संविधानिक लोकशाही आदर्श मानली आहे. तो मानवी स्वभाव वाईट, स्वार्थी मानतो पंरतु तो गणराज्याला योग्य पर्याय मानतो..
हाॅब्ज, लाॅक, रुसोच्या सामाजिक करारातून मानव अधिकाराचा सार पाहायला मिळतो तसेच हेन्री डेव्हिड थोरो यंाच्या ‘सिव्हिल डिसओ-बिडियन्स‘ या ग्रंथामध्ये मानव अधिकार हि संकल्पना उपयोगात आणली आहे.
थाॅमस पेन ने the Rights of man या ग्रंथातून नैसर्गिक अधिकार व्यक्तिला मानव असल्यामुळे जन्मतःच प्राप्त होतात म्हणून पंरपरा, कायदा, राज्य इ. किंवा अन्य संस्थेकडून प्राप्त होतात असे नाहीतर ते निसर्गतः व जन्मत प्राप्त होतात म्हणून कुणालाही हिरावून घेता येत नाही. हयुगो ग्रोशीयस यंानी असा तर्क दिला की नैसर्गिक कायद्याचा आधार विवेकशिलतेमध्ये शोधावा लागेल. यामुळे आपणास आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार घेता आला. तसेच ब्रिटन मधील 1688 ची रक्तहिन क्रांती हा मानवअधिकाराचा महत्वाचा दस्ताऐवज आहे.
अमेरिकेने 1773 मध्ये सम्राज्यशाहीच्या विरोधात बंड केले. थाॅमस पेनच्या पुस्तकाने व सामाजिक कराराच्या प्रभावातुन स्वातंत्र्याची चळवळ अधिक गतीमान झाली आणि तिसऱ्या जाॅर्जची सत्ता जनतेने उलटून टाकली. 4 जुलै 1778 रोजी अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनामा प्रसिध्द झाला. थाॅमस जेफरसन, मेडिसन, वांशिगटन इ. महापुरुशांचे योगदान महत्त्वाचे आहे. 1791 मध्ये मानवाधिकारांचा स्विकार घोषनापत्रात करण्यात आला. कलम 13 मध्ये गुलामगीरी प्रथेवर बंदी, कलम 14 मध्ये नागरीक अधिकार, कलम 15 मध्ये गुलामाना मतदानाचा अधिकार देखील करण्यात आला.
1789 फ्रांन्सच्या क्रांतीचे मुळ कारण निरंकुश राज्यशाहीमुळे मानव अधिकाराची झालेली पायमल्ली आहे. अमानवी, निरंकुश, विषमता आणि राज्यशाहीने जनतेवर केलेले अगणित अत्याचार होते. लुई आणि पोप यांच्या संगणमताने येथील निरंकुश राज्यकारभार चाले यामूळे जनता कायम शोषणाच्या जोखडात आडकलेली होती. हळूहळू या विरुध्द जनतेच्या रोषाला वाचा फोडण्याचे काम अनेक विचारवंताने केले. त्यामध्ये विशेषतः रुसो, माॅन्टेस्क्यु इ. ने स्वातंत्र्यासंबधी विचाराचा प्रचार व प्रसार केला रुसो व्यक्ति जन्मता स्वातंत्र आहे परंतु तो समाजाच्या अन्य बंधनात अडकलेला असतो. यामुळे फ्रंेच राज्यक्रांती झाली. या क्रांतीने स्वातंत्र, समता, बंधुत्व, न्याय लोकशाही हि मुल्य जगाला दिली आहेत. तसेच 1917 मध्ये रशियात जनतेने झार शाली उठवून टाकली आहे.
मानव अधिकाराचे आंतरराष्ट्रीयकरण
प्हिले महायुध्द आणि राष्ट्रसंघाच्या आदर्शवादाच्या अपयशानंतर 25 सप्टेबर 1926 मध्ये मानव अधिकाराचे आंतरराष्ट्रीय करण झाले. या दिवशी गुलामगीरी विरुध्द विश्वसंमेलन पार पडले. पूढे 1929 मध्ये आंतरराष्ट्रीय कायदा संस्थेने आंतरराष्ट्रीय मानवधिकाराची घोषणा केली. 28 जून 1930 रोजी वेठबिगारीवर विश्वसंमेलन पार पडले.
जनेवारी 1941 मध्ये अमेरिकन राष्ट्रध्यक्ष रुझवेल्टने घोषणा केली की, जगातील प्रत्येक ठिकाणी चार स्वरुपाचे स्वातंत्र असतील अभिव्यक्ती, उपासनेचे, भय मुक्तता आणि शांतता इ होत या वर्षीच आंटलाटिक घोषणापत्र प्रसिध्द झाले. फ्रॅंकलिन डी रुझवेल्ट आणि चर्चील यांनी संयुक्त घोषणापत्र आगस्ट मध्ये जाहीर केले. 1944 मध्ये चार महाशक्ती अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीन ने डुम्बार्टन ओक्स प्रस्तावावर सहमती दर्शवली यामधुनच संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्मितीची पाश्र्वभूमी तयार झाली. दुसÚया महायुध्दानंतर सन फ्रान्सीसको मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणा पत्राचा स्विकार करण्यात आला. यामध्ये मानव अधिकार आणि स्वातंत्र्याला चालणा देण्यात आली. या मध्ये घोषित करण्यात आलेली मुलभूत अधिकारामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा, मूल्य, स्त्रि पुरुष समानता इ. घोषणापत्रांचा पहिल्या कलमामध्ये युनोच्या घोषित उद्वेशात प्रमुख मानवअधिकारात चालणा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे अंतर्गत शांतता, मॅत्रीपूर्ण संबंध सुधारणा इ. जाहीरणाम्याचा 68 व्या कलमात तरतूद करण्यात आली आहे. यास अनुसरुन 1946 मध्ये श्रीमती एलीनार रुजवेल्टच्या अध्यक्षतेखाली कायदेशीरपणे मानव अधिकार आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाची तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. भाग 61 मध्ये सामान्य अधिकाराचे तत्व आमसभेची मान्यता असने आवश्यक होते. भाग दोन आंतरराष्ट्रीय करारणामे तयार करण्यात येवून सदस्य राष्ट्रंानी त्यावर स्वाक्षरी करणे अपेक्षीत होते. तीसरा भाग मानवअधिकाराच्या अंमलबजावण्ीची यांणा संदर्भात होता. या संदर्भाने थर्ड कमीटी आॅन सोशल हयुमनेटरियन अॅण्ड कल्चरल अफेअर्स समितीने 100 च्या वर बैठका घेवून सर्वदृष्टिने विचार केल्यानंतर आमसभेने वैश्विक मानवअधिकार घोषणापत्रावर 10 डिंसेंबर 1948 रोजी स्विकृत केले. तेव्हापासून 10 डिसंेबर हा जागतिक मानवधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. घोषणापत्रात नागरिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, कामकरण्याचा अधिकार, समानकासाठी समान वेतनाचा अधिकार, कामगार संघटना, विश्राम, शिक्षण, सांस्कृतिक संघटनाना भाग घेण्याचा अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार, अभिव्यक्ति धर्म शांतीपूर्ण सभा, संघटना स्थापन करण्याचा अधिकार इ. महत्वपूर्ण अधिकारचा मानवधिकार घोषणापत्रात समावेश करण्यात आला आहे. हे साधारणपणे 30 कलमाचे घोषणापत्र स्विकारण्यात आले.
सारांश
मनव अधिकाराची संकल्पणा आधुनिक वाटत असली तरीही तीचा उगम प्राचिन आहे. मानवी साधने बरोबरच मानव अधिकाराचा उदय झालेला आहे. आज ही संकल्पना एवढी व्यापक झाली आहे की, व्यक्तिच्या सर्वांगीण विकासासाठी अभिमान्य समजली जाते. किंवबहूना व्यक्ति म्हणून त्यस असलेली प्रतिष्ठा मानव अधिकाराचा आत्मा बनला आहे. व जगातील प्रत्येक नागरीकाला लागू होेते.
संदर्भ
डाॅ. वाघमारे बी.एस., मानव संसाधन विकास व मानव अधिकार पीअर्सन प्रकाशन, नवी दिल्ली. 2013.
शर्मा रमेश मिश्रा एम.के. महिला और मानव अधिकार, अर्जुन पब्लिशिंग, नई दिल्ली. 2010.
बबेल बसंतीलाल, मानवाधिकार, सेंट्रल लाॅ पब्लिकेशन, दिल्ली. 2016.
डाॅ. सिंह धरम, मानवाधिकार, भारत बुक्स सेंटर, दिल्ली. 2015.
No comments:
Post a Comment