प्रस्तावना :
भारतीय स्वातंत्र संग्रामातील एक अहिंसक वादळ म्हणजे म.गांधी किंवा गांधीयुग होय. टिळकांच्या निधनानंतर काँग्रेस नेतृत्वाची सर्वजबाबदारी म.गांधी यांच्यावर आली व १९२० ते १९४८ हा २८ वर्षाचा प्रदिर्घ काळ म.गांधी विचार व चळवळीने व्यापला होता व भारतीय स्वातंत्र्याचा लढा सविनय मार्गाने अधिक तीव्र झाला होता. भारतीय स्वातंत्र लढा व सामाजिक परिवर्तन या दोन्ही ही बाबी एकत्र साधन्याचे कसब गांधीजीमध्ये होते व १९४० नंतर हा लढा अधिक गतीमान झाला परिणामी भारत ब्रिटिशांच्या जोखडातून मूक्त झाला. या करीता गांधीजीने आपले जीवन अर्पण केले म्हणून त्याना राष्ट्रपिता म्हटले जाते.
म. गांधीजीच्या संबंध जिवनाचा लढा ब्रिटिश राजवटीच्या अत्याचाराच्या विरूद्ध होता. परंतू कधीही परकीय सत्तेशी लढण्यासाठी त्यांनी हिसांत्मक मार्ग अवलंबला नाही. तर अंहिसात्मक मार्ग व साधनाची पवित्रता महत्त्वाची मानून मानव जातीला वाचवण्यासाठी भारतातील सत्य, अंहिसा, सत्याग्रह, अपरीगृह, ब्रम्हचर्य इत्यादी नैतिक मूल्यांचे पुर्नुजीवन केले. भारतालाच नव्हे तर जगाचा विध्वंस होण्यापासून वाचवून नैतिक व अहिंसक, शांततामय मार्गाचा आदर्श घालून दिला.
अहिंसक तत्वाची जडण-घडण :
म. गांधीजीवर भगवत गीतेचा खोलवर प्रभाव पडला आहे. गांधीजी म्हणतात ``मी जेंव्हा जेंव्हा उदास होतो, तेंव्हा भगवतगीतेकडे वळतो.'' त्यांचे अनसक्ती योग हे महत्त्वाचे पुस्तक आहे. तसेच जैन,बौद्ध धर्माच्या शिकवणूकीतून अंहिसा तत्वाने प्रभावीत झाले व त्यातील श्रमाची प्रतिष्ठा त्यांच्या मनाला भावली. तसेच सर्मन ऑन दि माऊनटन यांची सविनय कायंदेभंगाची संकल्पनेने गांधीजींना प्रभावीत केले. तसेच जॉन रस्कीनच्या अन टू द लास्ट या पुस्तकाने त्यांच्या जिवनाला नवीन वळन मिळाले. तसेच लाओत्से व कन्पयुशियस यांच्या प्रभावातून गांधीयुग आकाराला आले.
गांधी विचाराचे नैतिक आणि अध्यात्मिक अधिष्ठान:
म.गांधीजींचा ईश्वरावर दृढ विश्वास होता. ईश्वरालाच ते सत्य व सत्ता मानत असत. ईश्वर म्हणजे एक स्वयंसिद्ध सर्वज्ञ सर्वगामी अशी जीवंत शक्ति असून प्राणीमात्र तिचा वास आहे. अशी त्यांची धारणा होती, `मी एक वेळ अन्नावाचून राहू शकेल परंतू प्रार्थने वाचून राहू शकणार नाही.' म्हणून गांधीजी म्हणतात की, `ईश्वर म्हणजे सत्य व सत्य म्हणजेच ईश्वर अशी त्यांची समजूत होती. सत्यागृहाचाही ईश्वर हाच प्रमुख आधार आहे व सृष्टीच्या निर्मीतीपासून ते आज तागायत पर्यंची वाटचाल ही ईश्वरी ईच्छेमुळेच शक्य झाली आहे. गांधीजी म्हणतात की, दैनंदिन जीवनात ईश्वरी दर्शनासाठी आध्यात्मीक शिस्तीची गरज असते. यातून व्यक्तीच्या जीवनास व कृतीला जिवंत स्फुर्ती धर्मातून मिळते. परंतू धर्म म्हणजे कर्मकांड नाही. तर आपली कर्तृव्य स्वईच्छने व जाणीवपूर्वक करत राहणे अशी त्यांची धारणा होती. यालाच गांधीजी स्वधर्म म्हणतात. कोणत्याही फळाची असक्ती ठेवू नये आणि कुणाची ही भीती बाळगू नये. त्यामूळे व्यक्ति मोहाच्या आहारी जावून अहंकार वाढणार नाही तर खरा अध्यात्मिक विकास साधला जाईल व ईश्वराचा साक्षात्कार होईल. व्यक्तिला आत्मबळ वाढवुन अमानवी शक्तिवर ताबा मिळवता येईल. आत्मबळ वाढवण्यास अंहिसा एकमेव साधन आहे. खर्या सत्याचा साक्षात्कार अंहिसेनेच होईल. सत्यवृत्त, भूतदया, न्याय, बंधुभाव शांती आणि प्रेम या जगात आधारभूत आहेत, यामुळेच व्यक्तिचा सर्वांगीण विकास साधता येईल असे गांधीजीचे म्हणने होते.
सत्य आणि अहिंसा : गांधी विचाराचा आत्मा
सत्य आणि अहिंसा मं. गांधीजीच्या विचाराचा पाया आहे. समाज राष्ट्रांना नैतिक बनवण्याचा गांधीजीचा माणस होता. म. गांधीजीच्या मतानुसार सत्य हि ईश्वर आहे सत्य सत तयार झाला आहे. याचा अर्थ होतो अस्तीत्व असणे सत्यास ईश्वर किंवा ब्रम्ह म्हणण्याचे कारण म्हणजे सत्य सत्ता व सत्ता म्हणजे परमात्मा ही सत्ता तिन्ही काळात असतो. यास गांधी सत्य म्हणतात. गांधीजी आपल्या जिवनाचे ध्येय सत्याचा शोध करणे आहे असे समजत. गांधीजीने सत्याचा व्यापक अर्थ सांगीतला आहे. विचार वाणी आचरणात सत्य असणे. गांधीजीच्या मंतानुसार दैनंदिन जीवनात सत्य सापेक्ष आहे. या सापेक्ष सत्यातुन निरपेक्ष सत्याकडे पोहचता येते. कारण निरपेक्ष सत्य ही जीवनाचे लक्ष आहे. याची प्राप्ती व्यक्तिचे परमधर्म आहे. म. गांधीजीच्या सत्याची संकल्पना केवळ व्यक्तिशी संबंधी नाही तर समाज व समुहाचा समावेश आहे. गांधीजी म्हणतात की संपूर्ण सत्याचे पालन, धर्म, राजकारण, अर्थकारण, कुटुंब, धोरण इत्यादी सत्याचा समावेश असावा.
अहिंसा सत्याकडे जाण्याचा एक मार्ग आहे. भगवान बुद्ध,रामचंद्र, जैन विदवान, टॉलस्टॉय इत्यादी अहिंसेची प्रेरणा म. गांधीना मिळाली आहे. अहिंसा म्हणजे केवळ हिंसा किंवा हत्या न करणे एवढाच नाही. कोणत्याही जीवाला स्वार्थ, क्रोध, दु:ख, कष्ट पोहचवने किंवा मारणे आहे. अहिंसेच्या अनुयायांनी आपल्या सर्व भावनेवर विजय मिळवून प्राण्याप्रती प्रेम आणि मैत्रीची भावना जोपासणे आहे. कुविचार, हिंसा मिथ्य भाषण द्वेषभावना, वाईट विचार इत्यादी बाबी देखील म. गांधी हिंसा मानतात.
म. गांधीजींनी साकारात्मक आणि नकारात्मक अहिंसा सांगीतली आहे. कोणत्याही प्राण्यास काम, क्रोध प्रेरीत होवून कुणाला हिंसा न पोहचवणे ही नकारात्मक अहिंसा आहे. साकारात्मक अहिंसा सार्वभौम प्रेम, करूणा इत्यादी भावनेवार आधारलेली आहे. याचे चार मुलभूत तत्त्व आहेत. प्रेम, धैर्य, अन्यायाचा विरोध आणि विरता म. गांधीजीने अहिंसेचे तीन प्रकार सांगीतले आहेत.
जागृत किंवा वरीपुरूषाची अहिंसा ही दुखातुन निर्माण न होता अंतरआत्म्याचा स्वाभाविक आवाज आहे. अंतरीक विचाराची श्रेष्ठता व नैमिततेतून ही स्वीकारलेली असते. शक्तीशाली असून ही शक्तिचा वापर न करने होय. याचा सर्वच क्षेत्रात जनतेने उपयोग केला पाहीजे.
औचित्यपूर्ण अहिंसा एक धोरण म्हणून या अहींसेच्या स्वीकार केला जातो. ही व्यक्तिचा अहिंसा आहे किंवा असाहय व्यक्तिचा निष्क्रीय प्रतिरोध आहे. नैतिक विश्वासपैकी निर्बलतेच्या कारणाने ही अहिंसा स्वीकारली जाते.
भित्र्या व्यक्तिची अहिंसा भित्रे लोक सुद्धा अहिंसेचे ढोंग करतात. गांधीजी यास निक्रिय हिंसा म्हणतात मा. गांधी म्हणतात की, जर आमच्या हद्यात हिंसा भरलेली असेल तर आपली कमजोरी लपवण्यासाठी अहिंसेचा सहारा घेण्यापेक्षा हिंसा अधिक चांगली आहे म्हणून व्यक्तिला एकत्र जोडण्यात अहिंसेची भूमिका महत्त्वाची आहे. कारण ही अहिंसा सर्वांनी उपयोगात आणण्यासारखी आहे. गांधीजीच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास अहिंसा व्यक्तिगत गुण असेल तर ते माझे साठी ताज्य आहे. माझी अहिंसेची कल्पना व्यापक आहे. ती करोडो लोकांची आहे मी तर अहिंसेचा सेवक आहे. आम्ही हे सिद्ध करण्यासाठी जन्मलो आहे की, सत्य आणि अहिंसा व्यक्तिगत अचरणाचे नियम नाहीतर अहिंसा, समाज आणि राष्ट्राच्या धोरणाचा भाग असले पाहिजे. अहिंसा सर्वासाठी, सर्व वेळ, सर्व ठिकाणी आहे. म्हणून अहिंसा समाज व राष्ट्रांनी अंगीकारली पाहिजे. ही प्रासंगिकता आज देखील तेवढीच आहे.
सत्याग्रह क्रांतीचे अभेद्य साधन:
मा. गांधीजीने अहिंसेला मूर्तस्वरूप प्राप्त करून देण्यासाठी राजकीय क्षेद्धा व व्यवहारात उपयोगात आणलेली कार्यपद्धती म्हणजे सत्याग्रह आहे. याची सुरवात मा. गांधीजीने द. अप्रâीकेत केली आहे. सत्याग्रह म्हणजे आग्रह धरणे आहे. याचा आधार सत्यातून जतन होणारे प्रेम तथा अहिंसेची शक्ती आहे. ही शारिरीक किंवा भौतिक शक्ति व राहता ती आत्मीक आहे. याचा सार म्हणजे अंतीमत सत्याचा विजय होतो. मा. गांधीजीनी याचा उपयोग ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी केला आहे. शिवाय साधने ही असहकार, सविनय कायदेभंग, उपवास, हिजरत धरणे, हडताळ, सामाजिक बहिष्कार ही अहिंसक साधनाचा उपयोग गांधीजींना केला आहे. सत्यनिष्ठ, इमानदारी, निर्भयता, ब्रम्हचर्य, निर्धनता, अहिंसा हे सत्याग्रहीचे आवश्यक गूण आहेत. मा.गांधीजीने सत्य अहिंसा व सत्याग्रहाच्या संघटनाद्वारे वाईट प्रवृत्तीचा विरोध करणारे शस्त्र उपयोगात आणले आहे. सत्याग्रह केवळ विरोधी किंवा युद्धात उपयोगात आणावे असे नाही तर व्यक्तिगत जीवनातील वाईट प्रवृत्ती नाहीशा करण्यासाठीr देखील उपयोगात आणता येते. एवढेच नाहीतर सत्यागृहाने मानवीज्ञान आणि विचारधारेला प्रभावीत केले आहे. सत्याग्रह नवीन शास्त्र आहे अथवा कर्मयागाचे व्यवहारीक तत्वज्ञान आहे. आजच्या अनैतिक, अमानवीय, भ्रष्टाचारी, अन्याय, अत्याचार, स्त्रीदमन बलत्कार इत्यादी प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी आवश्यक शास्त्र आहे. कारण सत्याग्रहात घृणा, छळ, कपट असत्य वर्जीत आहे. गांधीजीच्या शब्दात सत्याग्रह सत्यावर आरूढ होवून अथवा सत्याला साक्षी ठेवणे. दुसर्या शब्दात प्रेमाने स्वत: कष्ट चलण्यास तत्पर असणे असा आहे. आपल्या विरोधकांच्या मनात अशी भावना जागृत करणे की, आपल्या व्यक्तिस हानी पोहचणार नाही म्हणून सत्यागृह आत्मनुभूती आणि संयोगाच्या माध्यमाततून पुढे चालतो. राज्याअंतर्गत निर्माण होणारा हिंसाचार , विद्रोह वाईट प्रवृत्ती इत्यादीवर इतरांना त्रास न देता मनपरिवर्तनातून सामाजिक परिवर्तन घडून येते.
अहिंसा क्रांतीचा मार्ग :
जगातील वाढती शस्त्र स्पर्धा, दहशतवाद, हिंसाचार यावर प्रतिबंध करण्यासाठी अंहिंसा एक अमोघ शस्त्र आहे. कारण समाजात विस्तारीत जाणारी हिंसा व हिंसाचार वाढत जात आहे. आपण सत्यमेव जयते म्हणतो परंतू सत्य मार्गावर कोण? चालतो. त्यासाठी सामान्य जनतेत जावून अंहिसेचा प्रचार करावा लागेल व यातून जनतेत निर्भयता निर्माण करावी लागेल. थोडक्यात अहिंसेतूनच चांगला नागरीक घडवता येईल. याकरिता आपल्या शिक्षणामध्ये अंहिसा तत्व आणि संस्काराचा अंर्तभाव करून नवी पीढी घडवावी लागेल. तरच म. गांधीजीचे विचार साकार होतील.
अंहिसा सक्रीयपणे ज्ञानपूर्वक कष्ट सहन करणे तात्पर्य अन्याय व अत्याचारापूढे नतमस्तक न होता. अत्याचारा विरूद्ध आपली आत्मीकशक्ती आजमावने म्हणजे अंहिसा आहे. या नियमानुसार चालणारा एखादा व्यक्ति देखील आपला सन्मान धर्म आणि आत्म रक्षणासाठी साम्राज्यवादी व्यवस्थेशी आव्हान देवू शकतो, समाजसुधारणेची पार्श्वभूमी तयार करू शकतो. म्हणून अहिंसेचा मार्ग हा क्रांतीकारक व मूलगामी आहे याचा सर्वांनी स्विकार करावा. अहिंसेचा मार्ग अवलंबवण्याची कोणत्य्ाा शस्त्राची गरज नाही तर याची आवश्यकता यासाठी आहे की, आपले शरीर हे केवळ शरीर नाही तर एक अमर आत्मा आहे. भारतीय मनुष्य स्वभावाचा विकास अशा मर्यादेपर्यंत झाला आहे की, सामान्य जनते करिता हिंसे ऐवजी अंहिसेचा सिद्धांत अधिक स्वभाविक आहे. शांतता प्रस्थापित होण्यासाठी शांततामय साधनाच्या अवंलबंनामूळे शोषण, अत्याचाराचा प्रतिकार करण्याचा पर्यन्त करावा या साधनाद्वारे स्वातंत्रता मिळवावी, जर यशस्वीपणे आपण असे केले तर जागतीक शांतता स्थापनेच्या दिशेने केली जाणारी जास्तीत जास्त मदत असेल.
राजकारणाचे आध्यात्मिकरण:
म.गांधीजीने राजकारणाचे आध्यात्मिकरण केले आहे. त्यांचा विश्वास होता की, राजकारण मानवी समाजासाठी वरदान ठरेल. याकरीता उच्चत्तर नैतिक आणि आध्यात्मिक सिंद्धांतावर निर्भर असावा. गांधीजीने राजकारणाला उच्च नैतिक आणि धार्मीक भावनेचे प्रतिक मानतात. गांधीजी `धर्म आणि राजकारण यात फारकत करत नाहीत. तर गांधीजी म्हणतात की, धर्म विरहीत राजकारण असू शकत नाही. धर्मापासून वेगळे राजकारण म्हणजे मुडद्या समान आहे. त्यात आत्म्याचे हनन होते. गांधीजी धार्मीक धर्मांधत: व कर्मकांडाचे समर्थक नव्हते. त्यांचा दृष्टीकोण लौकीक व मानवतावादी होता, प्राणीमात्राची सेवा करणे हे वास्तविक अध्यात्मीक जीवनाचे मूलतत्त्व मानत होते. त्यांचे म्हणने होते की, `मानवी क्रियेपासून अलग कोणता धर्म नाही. राजनीति शब्दात नीती अर्थात धर्म आणि मानवतेला प्राथमिकता देत होते `राज अर्थात सत्ता' नाही तर धर्मासंबंधी लौकीक दृष्टीकोणामूळे गांधीजीने राजकारणात प्रवेश केला. कारण (तत्कालीन) वर्तमान राजकारण धर्म विरहित होत चालले आहे. आणि धर्माची राजकारणात पुर्नस्थापना करणे आपले कर्तृव्य समजत असत. गांधीजी म्हणतात, `मी राजकारणात याकरिता भाग घेतो की, राजकारण आपणास सापा सारखे चहूबाजूने घेरले आहे मी या सांपाशी संघर्ष करू ईच्छीतो. म्हणून मी राजकारणात प्रवेश करू ईच्छीतो. राजकारण आणि धर्माचा काही संबंध नाही असे म्हणणार्याला गांधीजी उत्तर देतात की, त्यांना धर्माचा व राष्ट्रप्रेमाचा अर्थ कळला नाही गांधीजीच्या मते राजकारण राष्ट्र धर्म आहे, यापासून वेगळे होवून व्यक्ति आपला आत्मघात करून घेईल त्यामूळे राजकारण धर्म आणि नैतिकतेची एक शाखा आहे. परिणामी राजकारण `शक्ति' आणि `संपती' मिळवण्याचा संघर्ष नाही तर लाखो पददलितांना सुंंदरजीवन उदर्रनिर्वाह करण्यास योग्य बनवणे, मानवी गूणांचा विकास करणे, व्यक्तिचे स्वातंत्र्य, बंधुभाव, सामाजिक, समानता संदर्भात जागरूक करण्याचा निरंतर प्रयत्न करावे. एखादा राजकीयतज्ञ हा उद्देश प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो तो धार्मीक असल्याशिवाय शक्य नाही.
सर्वोदय समाज व्यवस्थेतील राज्य धर्मनिरपेक्ष असेल तात्पर्य राज्याच्या नागरिकांना निर्विवादपणे स्वधर्म पालणाचा आधिकार असेल, राज्य एखाद्या कोणत्याही धर्मांचे सरंक्षण करणार नाही किंवा धर्म राज्याच्या सर्वांगीन विकासास बाधक ठरणार नाही. कारण राज्याचा कोणताही धर्म किंवा संप्रदाय नसेल तर सर्वधर्मसमभाव असेल सत्य, अंहिसा, प्रेम, सेवा इत्यादी पालण करेल. गांधीजी नैतिकता आणि शुद्ध विचार, अचरणास खरा धर्म मानतात व राजकारणात देखील नैतिक मूल्याला महत्त्व दिले राजकारण हिसंक आहे. कारण सत्या व धर्मांच्या शाश्वत तत्वावर चालत नाही व यामूळेच मानवी जीवनास गती मिळते यामूळे राजकारणाच्या आध्यात्मिकरणाला चालणा देतात. गटबाजी, सौदेबाजी, विघटनात्म घटक, विद्रोह इत्यादीचे उन्मूलन होवून परस्पर सहकार्य, सदभावना, समन्वय इत्यादी करिता राजकीय आध्यात्मिकीकरणाचा उपदेश करतात.
अराज्यवादाचे समर्थन:
अराजकतावादी विचारप्रवाह दोन प्रकारेचे आहेत प्रुब्धो, बॉकनिन, क्रोपोटकीन, मार्क्स क्रांतीकारी तर विलियम गॉडवीन, टॉल्सटाय यांच्यासारखे अंहिसक अराज्यवादी या परंपरेत म. गांधी यांचा समावेश होतो. अराज्यवादी विचार राज्यविहिन समाजाची कल्पना करतात. जनतेचे कल्याण, राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप व काही निवडक कार्यच राजकीय शक्तिने करावे. गांधीजीने राज्याचा विरोध केलेला नाही. तर राज्यात हिंसाचार शोषण, अत्याचार नष्ट करून वर्तमान राजकीय व्यवस्था अिंहसात्मक साधनांच्या आधारावर राज्य नैतिक बनवायचे होते. यामध्ये प्रत्येक व्यक्तिचे स्वईच्छेने सहभाग असेल राज्य विहिन समाज पूर्णपणे अहिंसक असेल भांडण, तंट्याचा निपटारा ग्रामपंचायत करेल यात समाजातील प्रत्येक सदस्य शासनात सहभागी असेल हे अशा पद्धतीने वागतील की, दुसर्याच्या कार्यात अडथळा निर्माण करणार नाहीत. स्वच्छ, साधे आणि निर्मळ जीवन असेल , मोठे दुर्गंधीयुक्त शहर असणार नाही, मोठे यांत्रीकीकरण असणार नाही व शोषण असणार नाही. गांधीजी राज्यविहीन समाजाची कल्पना करत असले तरी राज्य समाप्त करण्याचे समर्थन करत नाहीत. तर राज्याचे कार्यक्षेत्र कमी करण्याव होते या विचारास सैद्धांतिकदृष्टीने अराज्यवादी किंवा व्यवहारिक व्यक्तिवादी म्हटले जाते, गांधीजींने म्हटले की, हिसेंच्या आधारावर राज्य नष्ट केले जावू शकत नाही. यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. १. सत्ता विकेंद्रीकरण, २. राज्याच्या अंतर्गत एक व्यक्ति किंवा गटात सत्तेचे केंद्रीकरण झालेले असू नये, ३. प्रभूसत्तेचा विरोध, गांधीजी शुद्ध नैतिक सत्तावर आध्ाारित जनतेच्या प्रभुसत्तेवर विश्वास ठेवतात. नैतिकतेचे विरोध करणारे कायदयाचा विरोध करतात. तर ४. राज्याचे कमीत कमी कार्यक्षेत्र असावे. गांधीजी म्हणतात की सर्वोत्तम राज्य म्हणजे जे सरकार कमीत -कमी शासन करते अशा प्रकारे म. गांधीजींने अराज्यवादाचे समर्थन केले आहे.
म.गांधी :क्रांतीकारी परिवर्तन :
गांधीजी रूढीवादी होते की, क्रांतीकारी असा प्रश्न निर्माण होतो. राज्यशास्त्रज्ञाने रूढीवादाचे चार वैशिष्टये सांगीतलेली आहेत १. धर्म आणि संपत्तीचा आदर्श २. समाजाच्या ऐतीहासीक विकासावर विश्वास ३. इतिहासात लोकांच्या ईच्छेप्रमाणे वळण देणे ४. जिवनाचे काम निष्ठपूर्वक करणे या अवलोकनानंतर गांधीजीना रूढीवादी म्हणता येत नाही. गांधीजीने आपले संपूर्ण जीवन सामाजिक व्यवस्थेत परिवर्तन करण्यासाठी अर्पण केले आहे. सत्य, अंहिसा, सत्याग्रह ही कार्याचे सुत्र आहेत. वर्तमान राजकीय व्यवस्थेत या सुत्राने बदल घडवता येतो व हि सुत्र सर्वांनाच अवलंबवता येतात असा विश्वास म. गांधी देतात. कायदा प्रस्थापनासाठी जे बाधक असतात परदेशी असो की, स्वकिय असो या मार्गाने त्याच्या मुकाबला करता येतो. गांधीजींचा असा विश्वास होता की, मनुष्यात एवढी क्षमता आहे की तो समाज आणि सत्याचा विकास स्वत: च्या ईच्छेने करू शकतो. जर राज्य जनतेची अवहेलना करत असेल तर जनतेने राज्याचा अहिंसात्मक साधनाने विरोध करावा.
सारांश :
अशा प्रकारे म. गांधीजीने भारतीय स्वातंत्र लढा व परिवर्तनात महत्त्वाची भूमिका आहे. म. गांधीजीने वर्तमान भारतीय समाजात निर्माण झालेले विविध प्रश्न, भष्ट्राचार, शोषण,अन्याय, अत्याचार, स्त्री अत्याचार , अनैतिकता, दहशतवाद, नक्षलवाद, अशा अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्याची सोडवणूक गांधी विचाराने करता येईल. परंतू वर्तमान राजकारण किंवा राजकीय पक्ष व पूढारी गांधीजीच्या नावाने गांधीगीरी करत आहेत. गांधीजींनी प्रतिपादन केलेले सत्य, अहिंसा,सत्याग्रह राजकारणाचे आध्यात्मिकिकरण भारतीय राजकारणाला नैतिकमार्गावर आणण्यासाठी अतिशय मार्गदर्शक आहेत.
संदर्भ :
म. गांधी सत्याचे प्रयोग (आत्मकथा), नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद, २००९.
म. गांधी, मेरे सपनों का भारत, राजपाल एंण्ड सन्ज, दिल्ली, २०१२.
म. गांधी, हिंदस्वराज्य, १९५९.
म.गांधा- सत्याग्रह
म. गांधी, अनासक्तीयोग, सस्ता साहित्य मंडळ, दिल्ली १९५७.
यशपाल जैन, अहिंसा का अमोघ अस्त्र, सस्ता साहित्य मंडळ प्रकाशन , इलाहाबाद २०१२.
जैन पुखराज, स्वतंत्रता आंदोलनका इतिहास.
भोळे, भा.ल. आधूनिक भारतीय राजकीय विचार, पिंपळापुरे प्रकाशन, नागपूर २००३.
दादा धर्माधिकारी, सर्वोदय दर्शन, सर्वसेवा संघ प्रकाशन, वाराणसी, १९८३.
१०.पास्कल अॅलन नाझरेथ (अनुवाद) सुाता गोडबोले, म.गांधी, राजहंस प्रकाशन, पुणे
२०१४.
No comments:
Post a Comment