Monday, 2 January 2023

कंधार तालुक्यातील शेकाप हा केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वामुळे टिकून राहिला

 
महाराष्ट्र राज्यातील समाजकारण व राजकारण आपल्या देशातील पुरोगामी डाव्या विचाराने प्रभावित असलेले आहे असे सर्वत्र मान्य केले जाते . महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा ठसा येथील सर्वच पक्षांवर दिसून येतो . तथापि डावे व पुरोगामी पक्ष फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांची बांधीलकी अधिक प्रमाणात प्रतिपादन करतात . भारतात अस्तित्वात असलेली पारंपरिक शोषणावर आधारित सरंजामी , जातीधिष्ठित समाजव्यवस्था नष्ट करुन आधुनिक समाजवादी समाज रचना व सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे पुरोगाशक्तीचे मुख्य ध्येय आहे . महाराष्ट्रातील पुरोगामी राजकारण या संदर्भात अधिक आक्रमक दिसून येते . १ ९ व्या शतकाच्या  आरंभी भारतात विविध सामाजिक सुधारणावादी चळवळी सुरू झाल्या . महाराष्ट्रात म.फुले यांच्या कार्यातून  .महाराष्ट्रातील शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया,कामगार,शेतकरी, शेतमजूर आदी उपेक्षित समाजघटकांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे येथील सामाजिक, आर्थिक व राजकीय बदल घडून आला.या प्रेरणेतून शेतकरी चळवळी निर्माण झाल्या परिणामी शेकाप या चळवळीची फलनिष्पत्ती आहे. शेकाप विस्तारत असताना कंधार हा शेकापचा बालेकिल्ला बनला त्याचे सर्व श्रेय केशवराव धोंडगे आणि गुरुनाथराव कुरूडे यांना द्यावे लागते.
  शे.का.प.च्या स्थापनेनंतर शे.का.प.चा महाराष्ट्रात झपाट्याने विस्तार झाला . रायगडचे भाऊसाहेब राऊत , पुणे येथील जेधे - मोरे , सोलापूरचे तुळशीदास जाधव , बेळगावचे दाजीबा देसाई , दत्ता देशमुख , साताऱ्याचे नाना पाटील , नासिकचे काकासाहेब वाघ , नगरचे पि.के. भापकर , बुलढाण्याचे काशीनाथ पाटील , भास्कर सिंगणे , ठाणेच्या कृष्णराव धुळूप तर मराठवाड्यातील नरसिंहराव काटीकर , किशनराव देशमुख , उद्धवराव पाटील ( लातूर ) अण्णासाहेब गव्हाणे ( परभणी ) , अशा संस्थापक सदस्य व अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जिल्हा व तालुका स्तरावर पक्षाच्या शाखा निर्माण केल्या . 

नांदेड जिल्ह्यात विठ्ठलराव शिंदे यांनी पक्ष बांधणीचे काम संपूर्ण जिल्ह्यात सुरू केले . तसेच कंधार येथे केशवराव धोंडगेंनी शे.का. पक्षाची शाखा स्थापन केली आणि कंधार तालुक्यात हजारो  तरुणांना शे.का. पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्र आणले . शे.का. पक्षाच्या ध्येय धोरणांची ओळख व्हावी म्हणून क्रांतिसिंह नाना पाटलाची सभा कंधारमध्ये आयोजित केली होती . आपल्या शंभर कार्यकर्त्यासह क्रांतिसिंह नाना पाटील या सभेला उपस्थित राहिले . शे.का.पचे ( संपा मोरे शंकरराव ) जनसत्ता साप्ताहिक आपल्या वाचनालयात उपलब्ध करून घेतले जेणे करून कंधारसारख्या ग्रामीण भागातील तरुणांना खऱ्या राजकीय परिस्थितीची ओळख व जाणीव जागृती व्हावी या व डावे पुरोगामी विचार लोकांना समजावे हा मागचा हेतू होता . ' यामुळे कंधार तालुक्यात शे.का. पक्षाला मोठा जनाधार मिळाला आणि त्याचे नेतृत्व केशवराव धोंडगे यांनी केले आणि प्रदीर्घकाळ कंधार तालुक्यात शे.का.प.चा प्रभाव होता . या पार्श्वभुमिवर केशवराव धोंडगे यांचे संमोहक नेतृत्त्व उदयास आले . आणि प्रदीर्घकाळ कंधार तालूक्यात शे.का.प.चा प्रभाव होता . या नेतृत्त्वाचा जो जादूई प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावर राहिला त्याचा शोध घेणे गरजेचे आहे . नांदेड जिल्ह्यात सर्वत्र काँग्रेस पक्षाचे प्राबल्य होते . पण कंधार विधानसभा मतदार संघात शे.का. पक्षाचे सातत्यपूर्ण यशस्वी कार्य उल्लेखनीय आहे . कंधार मतदारसंघ मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील शे.का.प.चा बाले किल्ला किंवा गड का ? मानला गेला याकडे अभ्यासकाचे लक्ष जाते . ग्रामीण महाराष्ट्रात , खेडोपाड्यांत शे.का. पक्षाने आपली चांगली पकड निर्माण केली व महाराष्ट्रात काँग्रेसला पर्याय ठरू शकेल असा विश्वास निर्माण केला होता . सध्याची अनिश्चित राजकीय परिस्थिती लक्षात घेता एकाच पक्षाने प्रदीर्घ काळ सत्तेत राहणे व नेतृत्वाची पकड टिकून ठेवणे कठीण आहे . विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहून नेतृत्त्व कायम ठेवणे नक्कीच अवघड आहे . परंतु शे . का . पक्षाने कंधार मतदारसंघात सत्ता प्राप्त करण्यात असे यश मिळविले आहे . कंधार विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय पक्षांनी ढवळाढवळ करून पाहिली पण यात त्यांना अपयश आले . केशवराव धोंडगे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे शे.का. पक्षाचे नेते आहेत की ज्यांनी जनसामान्याच्या प्रश्नाला वेशीवर टांगण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे . त्यांनी कंधार  विधासभा मतदारसंघाचे तब्बल ६ वेळा यशस्वीरीत्या प्रतिनिधित्व केले . त्यांच्या प्रतिनिधित्वाचा कार्यकाल असा ( १ ९५७-१९ ६२ , १ ९६२-१९ ६७ , १ ९६७-१९ ७२ , १ ९७२-१९ ७७ , १ ९८५-१९९ ० व १ ९९०-१९९ ५ तसेच १ ९ ७७ ला नांदेड लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर देखील खासदार म्हणून निवडून आले होते . इतक्या वेळा निवडून येण्याचा इतिहास धोंडगे यांनी घडविला . त्यामुळे मतदारसंघातील शे.का.प. चे निर्विवाद नेतृत्व सिद्ध झाले आहे . याचे रहस्य म्हणजे वर्तमान ज्वलंत प्रश्नांच्या संदर्भात शे.का. पक्षाची भूमिका व विचारसरणी जनसामान्यांच्या बोलीभाषेतून मांडण्याची त्यांची खास शैली होती . लोकांच्या प्रश्नाचा गांभार्याने व आस्थेने अभ्यास करण्याची सवय धोंडगे यांना आहे . शिवाय ज्वलंत समस्या सोडविण्याची शैली शे.का. पक्षात त्यांनी निर्माण केली होती . कंधार विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत १ ९ ५७ ते १ ९९ ५ पर्यंत केवळ ( १ ९ ८१ ते ८५ ) एक ईश्वरराव नारायण भोसीकर यांचा अपवाद वगळता शे.का. पक्षाकडेच विधानसभेची जागा किंवा सत्ता राहिलेली आहे . पक्षाच्या यशामागे दोन प्रमुख कारणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरली आहेत . एक म्हणजे ' शोषित वंचिताच्या शोषणाचा मुद्दा ' घेऊन सतत संघर्ष करणे व दुसरे म्हणजे ' नेतृत्त्वाची भूमिका ' यशस्वीपणे पार पाडणे हे होय . 
मतदारसंघाच्या विकासाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे . कंधार मतदारसंघ नेहमी शे.का.पक्ष या विरोधी पक्षाच्या हाती राहिल्यामुळे येथे पायाभूत सुविधा रस्ते , वाहतूक व्यवस्था , सार्वजनिक आरोग्य , शिक्षण , पाणीपुरवठा इ . चा म्हणावा तेवढा विकास होऊ शकला नाही . कंधार मतदारसंघात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी धोंडगे यांच्या प्रभावी नेतृत्त्वामुळे कंधार मतदारसंघातील शे.का.पच्या आक्रमक संघर्षामुळे सत्तारुढ सरकारला जेरीस आणून विकासाच्या मागण्या पूर्ण करून घेण्यातच यश मिळाले आहे . इतर शेजारील मतदारसंघापेक्षा निश्चितच तो तुलनेने समाधानकारक आहे . उल्लेख केलेले वरील मुद्दे हे कंधार मतदारसंघामध्ये निवडणुकीचे राजकारण करू इच्छिणाऱ्या राजकीय शक्तींच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत . त्या राजकीय शक्तीमध्ये , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस , शेतकरी कामगार पक्ष , भा.ज.प. ( पूर्वीचा जनसंघ ) , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षांचा समावेश होतो . परंतु , इतर राजकीय पक्षांपेक्षा शे.का.पक्षाला जनाधार अधिक होता . कारण शेतकरी कामगार पक्षाने अल्पभूधारक , शेतकरी शेतमजूर , कामगार दलित , भुमिहीन , मजुर आणि स्त्रिया यांच्या विकासा संदर्भातील प्रश्नाचे राजकीयीकरण करण्यामध्ये प्रभावी भूमिका बजावली आहे . कंधार मतदारसंघात शे.का.प. ने राजकीय अभिसरणाचे व लोकसंघटनात्मक केलेले कार्य उल्लेखनीय आहे . केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वगुणांमुळे व लोकांना राजकीय पक्षांकडे आकर्षित करण्याच्या शैलीमुळे , विविध प्रकारचे नवनवीन सत्याग्रह , संकल्पनेमुळे प्रचंड जनसमुदाय शे.का.प.कडे आकर्षित झालेला दिसतो . केशवराव धोंडगे यांनी एक नेता म्हणून अंगीकृत केलेल्या तीन तत्त्वांमध्ये दडलेले आहे . तत्कालीन ज्वलंत प्रश्नांच्या संदर्भात शे.का.प. भूमिका जनसामान्यांच्या बोलीभाषेतुन मांडण्याची त्यांची खास शैली . त्यांचे मतदारसंघातील दैनंदिन प्रश्नांना सत्याग्रहाच्या माध्यमातून वाचा फोडणे व लक्ष वेधणारे उपक्रम महाराष्ट्र राज्य विधिमंडळातील त्यांच्या कार्यामुळे स्थानिक , राज्य व राष्ट्रीय प्रश्नासंदर्भातील महत्त्वपूर्ण पाया तयार झाला .   शे.का. पक्षाने केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्त्वाखाली कंधार विधानसभा मतदारसंघातील सामाजिक , सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थितीच्या सुधारणेसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे .कंधार मतदारसंघात पुरोगामी , लोकशाही परिवर्तनवाद व विचाराला चालना मिळाली आहे . मुख्यतः केशवराव धोंडगे यांनी हिन्दू धर्मीय पवित्र ग्रंथ रामायणावर केलेली टीका , जातीव्यवस्थेविरुद्ध केलेले बंड महाराष्ट्रातील रूढीवादी व सनातनी शक्तीना मोठे आव्हान देणारे होते .  केशवराव धोंडगें यांच्या कार्याची पध्दत वैज्ञानिकता व अनुभवजन्यता ( Empricism ) स्वीकारणारी आहे . तो विज्ञानवाद त्यांच्या वृध्दापकाळात अन्वयार्थ ( Hermenetics ) पध्दतीकडे झुकला आहे . त्यांनी मांडलेल्या गुराखी गडाची संकल्पना . कंधार विधानसभा मतदारसंघात राजकीय नेतृत्वाने राजकीय सत्तेवर टिकून राहण्यासाठी भावनिक आणि तर्कशुद्ध अशा दोन्ही पातळीवरील राजकारण केले आहे .  केशवराव धोंडगे यांच्या अष्टपैलू नेतृत्वामुळे अल्पभूधारक , लहान शेतकरी , भूमिहीन जनता , दलित व स्त्रिया यांच्यात शोषणाविरुद्ध जाणीव जागृती व परिवर्तन घडवून आणण्यात मोलाची मदत केली आहे . केशवराव धोंडगे यांनी विधानसभेत व लोकसभेतील केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे . या कामगिरीचा उपयोग कायदानिर्मितीसाठी निश्चितच झाला आहे . त्यांची सभागृहातील भाषणे शासनास निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक ठरली आहेत .थोडक्यात कंधार विधानसभा मतदासंघात धोंडगे यांच्यामुळेच शेकाप प्रदीर्घकाळ टिकून राहण्यात यशस्वी ठरला आहे.

No comments:

Post a Comment